Site icon Sahyadri Express

प्रोड्यूसर ऑर्गनायझेशन व FPO ची संकल्पना काय आहे?|What is the Concept of Producer Organisation or FPO ?

निर्माता संस्था (Producer Organisation), प्रोड्यूसर संस्था, उत्पादक संघटना, उत्पादक संस्था, प्रोड्यूसर ऑर्गनायझेशन, शेतकरी उत्पादक संघटना, शेतकरी उत्पादक कंपनी

निर्माता संस्था (Producer Organisation), प्रोड्यूसर संस्था, उत्पादक संघटना, उत्पादक संस्था, प्रोड्यूसर ऑर्गनायझेशन, शेतकरी उत्पादक संघटना, शेतकरी उत्पादक कंपनी

नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांनी प्रोड्यूसर ऑर्गनायझेशन अथवा उत्पादक संस्था म्हणजे जसे की, शेतकरी उत्पादक संस्था म्हणजे FPO आणि शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे FPC याबद्दल वारंवार कोठे ना कोठे ऐकलेले अथवा वाचलेले असते. आज मितीला देशात अनेक नवनवीन शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन होत आहेत. भारत देश कृषी प्रधान देश आहे. सध्या भारतात ८५ टक्के शेतकरी हे लहान आणि सीमांत शेतकरी आहेत. याचा अर्थ त्यांची जमीन 2 हेक्टर पेक्षा कमी आहे. कुटुंबाचे विभाजन होऊन शेतकऱ्यांची जमीन प्रत्येक वेळी कमी होत आहे. देशातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या वाढण्याचे हे एक प्रमुख कारण आहे. लहान आणि अल्पभूधारक शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आपण FPO तयार करत असतो. कार्यक्षम, योग्य, किफायतशीर आणि शाश्वत संसाधनांच्या किंवा पर्यायांच्या वापराद्वारे लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवणे आणि सामूहिक प्रयत्नाने त्यांच्या उत्पादनाचे मूल्यवर्धनाद्वारे तसेच चांगल्या बाजारपेठेद्वारे जास्तीत जास्त परतावा प्राप्त करून देणे हे FPO आणि FPC निर्माण करण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. आपण शेतकरी उत्पादक संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपनीची संकल्पना काय आहे, याबद्दल माहिती घेण्याच्या अगोदर प्रोड्यूसर ऑर्गनायझेशनची संकल्पना काय आहे आणि निर्माता संस्था (Producer Organisation) म्हणजे काय? याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत.

1. प्रोड्यूसर ऑर्गनायझेशन अथवा निर्माता संस्था म्हणजे काय?|What is Producer Organisation?

निर्माता संस्था (Producer Organisation) अथवा प्रोड्यूसर संस्था/ प्रोड्यूसर ऑर्गनायझेशन ही कोणत्याही प्राथमिक उत्पादकांनी एकत्र येऊन त्यांच्याद्वारे तयार केलेली कायदेशीर आणि नोंदणीकृत संस्था असते. निर्माता संस्था आपल्या सदस्यांमध्ये नफा व इतर फायदे वाटून घेणारी आणि प्राथमिक उत्पादकांद्वारे चालवली जाणारी संस्था असते. प्रोड्यूसर कंपनी निर्माण झाल्यामुळे कंपनीच्या सदस्यांची प्राथमिक उत्पादने मोठ्या प्रमाणात एकत्रीकरणाद्वारे आणि कृषि निविष्ठांचे जसे की बी–बियाणे, खते, कीटकनाशके इत्यादी सारख्या खरेदी करताना मोठ्या पुरवठादार सोबत सौदेबाजीची शक्ति वाढवते. निर्माता संस्था अथवा प्रोड्यूसर संस्था हे कोणत्याही उत्पादनाच्या उत्पादकांच्या संघटनेचे सर्वसामान्य नाव आहे.

2. प्राथमिक उत्पादक म्हणजे काय ?| What is primary producer?

प्राथमिक उत्पादक म्हणजे कोणतीही व्यक्ती जी कोणत्याही मूळ व प्राथमिक वस्तू निर्माण करत असेल जसे की, शेतकरी, बिगर शेतकरी, मच्छीमार, दूध-उत्पादक, पशू पालक, विणकर, हातमाग, हस्तकला, ग्रामीण कारागीर, किरकोळ जंगली वन-उपज गोळा करण्यात गुंतलेल्या व्यक्ती इत्यादी व्यक्तीस आपण प्राथमिक उत्पादक असे म्हणत असतो.

कोणतीही व्यक्ती कोणत्याही प्राथमिक उत्पादनाशी संबंधित कोणत्याही उपक्रमात किंवा कार्यात गुंतलेली असेल तर त्या व्यक्तीस उत्पादक म्हणतात. प्राथमिक उत्पादन म्हणजे कृषी आणि संलग्न कार्यामधून शेतकऱ्यांचे उत्पादन, हातमाग, हस्तकला आणि इतर कुटीर उद्योगांमध्ये गुंतलेल्या व्यक्तींचे उत्पादन यामध्ये समाविष्ट होत असते. शेती, फलोत्पादन, पशुपालन, मत्स्यपालन, रेशीमपालन, मधमाश्यापालन, हातमाग, हस्तकला इत्यादींमध्ये गुंतलेल्या व्यक्ती ह्या प्रोड्यूसर ऑर्गनायझेशनचे सदस्य होऊ शकतात.

3. निर्माता संस्थेची कोणती व काय-काय नावे आहेत?| What are the names of the producer organization?

आपण सर्वांनी वेगवेगळ्या ठिकाणी प्रोड्यूसर ऑर्गनायझेशन बद्दल काहीना काही तरी एकलेले असेल. सामान्यपणे प्रोड्यूसर ऑर्गनायझेशनला वेगवेगळी नावे वापरली जातात. जसे की, निर्माता संस्था (Producer Organisation), प्रोड्यूसर संस्था, उत्पादक संघटना, उत्पादक संस्था, प्रोड्यूसर ऑर्गनायझेशन, शेतकरी उत्पादक संघटना, शेतकरी उत्पादक कंपनी इत्यादी. जरी प्रोड्यूसर ऑर्गनायझेशनला वेगवेगळ्या नावाने ओळखले जात असले तरी त्यांची कार्य करण्याची पद्धत आणि लक्ष्य जवळपास समान असते.

4. निर्माता संस्थेचा मालक कोण असू शकतो?| Who can be the owner of the producer organization?

कायद्यातील तरतुदींनुसार प्रोड्यूसर ऑर्गनायझेशनची नोंदणी करून स्थापन केलेल्या निर्माता संस्थेची / प्रोड्यूसर ऑर्गनायझेशनची मालकी आणि नियंत्रण तिच्या भागधारक म्हणजेच सदस्यांकडे असते.

5. प्रोड्यूसर ऑर्गनायझेशनचे व्यवस्थापन कोण करतात?|Who will manage the Producer Organization?

प्रोड्यूसर ऑर्गनायझेशनचे व्यवस्थापन तिच्या सदस्यांच्या प्रतिनिधींमार्फत केले जाते. व्यवस्थापन उत्तमरीत्या करण्यासाठी उप-नियम तयार केले जातात. उप-नियमांनुसार आपल्या सदस्यामधून योग्य सदस्य निवडुन त्यांचे व्यवस्थापन मंडळ अथवा संचालक मंडळ निर्माण केले जाते. संचालक मंडळ आपल्या कामकाजाचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी इतर व्यावसायिक व्यक्तींची नेमणूक करतात, जसे की, मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा व्यवस्थापक (मॅनेजर) ची नियुक्ती केली जाते. संचालक मंडळ व्यवस्थापनाचे सर्व किंवा ठराविक अधिकार लेखी स्वरूपात मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा व्यवस्थापक (मॅनेजर) प्रधान करतात. तसेच इतर कर्मचारी सुद्धा नेमले जातात, जसे की कंपनीचे वित्तीय-खाते व्यवहार पाहण्यासाठी अकाऊंटंट (लेखापाल) नियुक्त केला जातो. विशेष सल्ला देण्यासाठी आणि विविध कामे करण्यासाठी कृषितज्ञ देखील नेमले जातात.

प्रोड्यूसर ऑर्गनायझेशन ही उत्पादकांची, उत्पादकांसाठी आणि उत्पादकांद्वारे चालवली जाणारी संघटना असते. एक किंवा अधिक संस्था आणि/किंवा व्यक्तींनी एकत्र येऊन तिची नोंदणी करून पीओचा व्यवसाय, नियोजन आणि कार्य केले जाते.

कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा गैर-सरकारी संस्था (NGO) सद्भावनेने किंवा प्राथमिक उत्पादकांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या उदात्त हेतूने त्यांच्या स्वत:च्या संसाधनांचा आणि मानुष्यबळाचा वापर करून प्रोड्यूसर ऑर्गनायझेशन (पीओ) साठी सहायता, सुविधा आणि मदत करू शकतात.

6. प्रोड्यूसर ऑर्गनायझेशनचे सदस्य कोण होऊ शकतात?| Who can become member of Producer Organization?

प्रोड्यूसर ऑर्गनायझेशन ही प्राथमिक उत्पादकांची संघटना असते. यामध्ये संबंधित भौगोलिक क्षेत्रात राहणारे आणि सारख्याच उत्पादनाचे उत्पादन करणारे सर्व प्राथमिक उत्पादक हे प्रोड्यूसर ऑर्गनायझेशनचे सदस्य असतात. कोणताही प्राथमिक उत्पादक अर्ज करून आणि नाममात्र सदस्यता शुल्क जमा करून प्रोड्यूसर ऑर्गनायझेशनचा सदस्य होऊ शकतो. प्रोड्यूसर ऑर्गनायझेशन सदस्यत्व ऐच्छिक असते आणि सदस्यत्व देण्याची व मिळविण्याची प्रक्रिया प्रोड्यूसर ऑर्गनायझेशनच्या उप-नियमांवर अवलंबून असते. सर्व सदस्यांना म्हणजेच संस्थापक-सदस्य आणि इतर सदस्य यांना समान अधिकार असतात.

7. निर्माता संस्थेची अथवा प्रोड्यूसर ऑर्गनायझेशनची वैशिष्ट्ये काय असतात?| What are the characteristics of producer organization or producer organization?

प्रोड्यूसर ऑर्गनायझेशन  ही प्राथमिक उत्पादकांद्वारे अथवा उत्पादकांच्या गटाद्वारे शेती किंवा इतर बिगरशेती कार्यासाठी नोंदणी करून कायदेशीर संस्था तयार केले जाते.  प्राथमिक उत्पादन/उत्पादनाशी संबंधित उत्पादक हे या संस्थेचे सदस्य अथवा भागधारक असून आपल्या संस्थेच्या सदस्य उत्पादकांच्या फायद्यासाठी कार्य असतात. प्रोड्यूसर संस्थाच्या विविध कार्यातून प्राप्त झालेले नफ्याचा काही भाग आपल्या सदस्यामध्ये वाटून उरलेला भाग प्रोड्यूसर संस्थाचा व्यवसाय वाढवण्यासाठी खर्च केला जातो.

8. प्रोड्यूसर ऑर्गनायझेशनचे कायदेशीर स्वरूप काय असते?| What are the legal forms of Producer Organizations?

प्रोड्यूसर ऑर्गनायझेशन ह्या देशातील विविध कायद्यांतर्गत नोंदणी करून स्थापन केलेल्या संस्था असू शकतात. प्रोड्यूसर ऑर्गनायझेशन स्थापन करण्यामागील प्रमुख उद्देश आणि त्यांची कार्यपद्धती यांच्या आधारावर खालीलपैकी कोणत्याही एका कायद्यातील तरतुदींनुसार प्रोड्यूसर ऑर्गनायझेशनची नोंदणी करून स्थापन केल्या जाऊ शकतात.

  1. राज्य सहकारी संस्था कायदा (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960)
  2. राज्य स्वायत्त किंवा परस्पर सहाय्यित सहकारी संस्था कायदा
  3. बहु-राज्य सहकारी संस्था अधिनियम, 2002
  4. भारतीय कंपनी कायदा, 1956 च्या कलम 581 अंतर्गत प्रोड्यूसर कंपनी (भारतीय कंपनी कायदा, 2013 च्या कलम 465 (1) मधील तरतुदीनुसार)
  5. सोसायटी नोंदणी कायदा, 1860 अंतर्गत नोंदणीकृत संस्था
  6. भारतीय विश्वस्त अधिनियम, १८८२ अंतर्गत नोंदणीकृत सार्वजनिक ट्रस्ट

ज्या प्रोड्यूसर ऑर्गनायझेशनची स्थापना सहकारी संस्था आणि उत्पादक कंपन्या म्हणून कायद्यांतर्गत नोंदणी करून केलेली असते अशा प्रोड्यूसर ऑर्गनायझेशनद्वारे कमावलेला नफा लाभांशाद्वारे सदस्यांमध्ये वाटून घेण्याच्या कायदेशीर तरतुदी सहकारी संस्था आणि उत्पादक कंपन्यामध्ये आहेत. इतर कायद्यांतर्गत नोंदणी केलेली संस्थामध्ये नफा वाटणीची व्यवस्था स्पष्टपणे आढळून येत नाही किंवा अशी संस्था या ना-नफा संस्था असतात.

9. शेतकरी उत्पादक संघटना म्हणजे काय?|What is Farmer Producer Organisation?

शेतकरी उत्पादक संघटना म्हणजे ही एक निर्माता संस्थेचाच प्रकार आहे, जिथे उत्पादक संघटनेचे सदस्य हे शेतकरी असतात. ही संघटना शेतकऱ्यांच्या उत्पादनास एकत्रीकरणाद्वारे व मूल्यवर्धन जसे की शेतमालाची वर्गीकरण, साफसफाई, प्रतवारी, ब्रँडिंग, पॅकिंग, वाहतूक इत्यादी द्वारे जास्तीत जास्त बाजारभाव मिळवून देण्याचे मुख्य कार्य करत असते. Farmer Producer Organisation ला सर्वसाधारणपणे FPO असे म्हणतात. FPO हे एक सर्वसामान्य नाव आहे.

10. शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे काय?|What is the Farmer Producer Company?

शेतकरी उत्पादक कंपनी ही शेतकऱ्यांद्वारे, शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी लोकशाहीच्या मार्गे भारतीय कंपनी कायदा, 1956 च्या भाग 9A अंतर्गत एक उत्पादक कंपनी म्हणून अंतर्भूत करून स्थापन केलेली कंपनी म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी होय.

भारतीय कंपनी कायदा, 1956 च्या भाग 9A मधील कलम 581 A ते 581 ZT या कलमांच्या अंतर्गत आणि भारतीय कंपनी कायदा, 2013 च्या कलम 465 (1) मधील तरतुदीनुसार FPC ची स्थापना आणि केले जाते. शेतकरी उत्पादक कंपनी ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व सहकारी संस्था दोन्हीचे फायदे लक्षात घेऊन निर्माण केली आहे. शेतकरी उत्पादक कंपनीला प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सर्व नियम लागू असतात. कंपनीच्या उभारणीतील आराखड्यामध्ये सहकारी संस्थेला लागू असलेले सर्व तत्त्व वापरलेले असतात.

वरील कायद्यानुसार शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यासाठी केवळ शेतकरी हेच कंपनीचे सभासद असू शकतात. शेतकरी सभासद हे कंपनीचे संचालक आणि व्यवस्थापक असतात, तसेच कंपनीचे व्यवस्थापन म्हणजे दैनिक कामकाजाचे नियोजन सुद्धा शेतकरीच करत असतात.

शेतकरी उत्पादक कंपनी (FPC) ही कोणत्याही 10 शेतकऱ्यांद्वारे किंवा अधिक अथवा प्राथमिक उत्पादक व्यक्ति किंवा दोन किंवा अधिक उत्पादक संस्थांद्वारे किंवा दोघांच्या एकत्रित प्रयत्नाने तयार केली जाऊ शकते. FPC हे सहकारी संस्था आणि खाजगी मर्यादित कंपन्यांमधील एक हायब्रिड (संकर) चा प्रकार आहे.

टीप:- वरील माहिती केवळ वाचकांचे ज्ञान वाढवण्यासाठी आहे अधिक माहितीसाठी आपल्या CA (चार्टर्ड एकाउंटेंट) ला भेटून माहिती घ्यावी.

वाचा – Click here – शेत रस्ता, पाणंद रस्ता, गाडी मार्ग, पाऊल रस्ता कायदेशीर हक्काने कसा मिळवायचा?

Exit mobile version