नमस्कार मित्रांनो, या ब्लॉगमध्ये तुम्हाला How to Apply for MIDC recruitment 2023 ची माहिती मिळणार आहे. मते आपण थोडक्यात पाहूया. MIDC या सरकारी कंपनी अथवा महामंडळामधे गट ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ या श्रेणीतील विविध 34 पदासाठीच्या “MIDC Recruitment 2023” द्वारा एकुण 802 अधिकारी आणि कर्मचारी पदासंख्यासाठी ऑनलाइन मार्गाने अर्ज भरण्यासाठी आणि परीक्षा घेण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. दिनांक 02 सप्टेंबर 2023 पासून 25 सप्टेंबर 2023 पर्यंत www.midcindia.org या वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी उपलब्ध आहे. वय मर्यादा उमेदवारांच्या श्रेणी आणि जाहिरातीच्या पदांवर (साधारण वय 18 ते 55 वर्ष) अवलंबून असेल. नोकरीचे ठिकाण संपुर्ण महाराष्ट्र असेल. उमेदवारांना परीक्षेचे ठिकाण, तारीख आणि वेळ इत्यादीची माहिती मोबाईलवर SMS व ई-मेलवर द्वारा कळवण्यात येईल. तसेच, महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळाद्वारा वेबसाइटवर सूचना देऊन माहिती कळवली जाईल.
MIDC म्हणजे काय?|What is MIDC ?
आपण येथे MIDC बद्दल थोडक्यात माहिती घेऊया. MIDC ची स्थापना M.I.D.C कायदा 1961 अंतर्गत 1962 मध्ये झाली आहे. MIDC महाराष्ट्र सरकारची प्रमुख औद्योगिक पायाभूत सुविधा विकास संस्था आहे. आतापर्यंत महाराष्ट्र राज्यात एमआयडीसीने 66273.82 (अंदाजे) हेक्टर जमिनीवर एकुण 289 औद्योगिक क्षेत्रे बांधली आहेत. महामंडळाने आयटी, बीटी, स्पेशल इकॉनॉमिक झोन (एसईझेड), वाईन (द्राक्ष प्रक्रिया) पार्क, सिल्व्हर झोन, जेम्स इत्यादींसह विविध औद्योगिक क्षेत्रांसाठी विशेष पार्क विकसित केलेले आहेत. महामंडळाचे मुख्यालय अंधेरी, मुंबई, महाराष्ट्र येथे असुन विद्यमान अध्यक्ष मा. श्री. उदय सामंत मंत्री (उद्योग), महाराष्ट्र सरकार तर मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) डॉ. विपिन शर्मा (IAS) आहेत. महामंडळाची मुख्य उद्दिष्टे ही औद्योगिक क्षेत्रांच्या विकासासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून काम करणे आणि राज्यातील नियोजित आणि पद्धतशीर औद्योगिक विकासासाठी औद्योगिक क्षेत्रे स्थापन करणे आहेत.
MIDC च्या परीक्षा संबंधित माहिती काय आहे?|What is Examination Related Information of MIDC?
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ या सरकारी कंपनी अथवा महामंडळामधे गट ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ या श्रेणीतील ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे. महामंडळामधे कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप-अभियंता (स्थापत्य/विद्युत/यंत्रिकी), सहयोगी रचनाकार, उप रचनाकार, उप मुख्य लेखाधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, सहाय्यक अभियंता (स्थापत्य/विद्युत/यंत्रिकी), सहाय्यक रचनाकार, सहाय्यक वास्तुशास्रज्ञ, लेखाधिकारी, क्षेत्र व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यंत्रिकी), लघुलेखक (उच्च श्रेणी/निम्न श्रेणी), लघुटंकलेखक, सहाय्यक, लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल, तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-२), इलेक्ट्रिशियन (श्रेणी-२), पंपचालक (श्रेणी-२), जोडारी (श्रेणी-२), असिस्टंट ड्राफ्ट्समन, ड्राफ्ट्समन, गाळणी निरीक्षक, सर्वेक्षक, सहाय्यक अग्निशमन अधिकारी, कनिष्ठ संचार अधिकारी, चालक यंत्रचालक, अग्निशामक विमोचक, आणि इलेक्ट्रिशियनची श्रेणी-२ (ऑटोमोबाईल) ही पदे सरळसेवा भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मगविण्यात आले आहेत.
नोकरीचे ठिकाण|Place of Posting –
संपुर्ण महाराष्ट्रात कोठेही.
MIDC चा अर्ज भरण्याचा कालावधी किती आहे?|What is duration of filing application form of MIDC?
दिनांक 02 सप्टेंबर 2023 पासून 25 सप्टेंबर 2023 पर्यंत www.midcindia.org या वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी उपलब्ध आहे.
परीक्षेची तारीखेची अधिसूचना|Date of Exam Notification
उमेदवारांना परीक्षेचे ठिकाण, तारीख आणि वेळ मोबाईलवर एसएमएस (SMS) व ई-मेलवर द्वारा कळवण्यात येईल. तसेच, महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळाद्वारा वेबसाइटवर सूचना देऊन माहिती कळवली जाईल. यासाठी उमेदवारांना वेळोवेळी एमआयडीसीच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
भरतीच्या इतर महत्त्वाच्या तारखा|Other Important Dates of Recruitment
अ.क्र | तपशील | तारीख |
1 | ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख | 02.09.2023 |
2 | ऑनलाइन सबमिशनची अंतिम तारीख | 25.09.2023 |
3 | ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख | 25.09.2023 |
4 | परीक्षेसाठी ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची तारीख | परीक्षेच्या आधी 7 दिवस |
वयोमर्यादा|Age limit
वयमर्यादा उमेदवारांच्या श्रेणी आणि जाहिरातीच्या पदांवर अवलंबून असेल (साधारण: वय मर्यादा वर्ष 18 पासुन ते 55 वर्ष). उमेदवाराची वयोमर्यादा ही दिनांक 25/09/2023 रोजीचे वयानुसार विचारात घेतले जाईल.
पात्रता निकष Eligibility Criteria
उमेदवार हा भारताचा नागरिक असावा. उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. इतर पात्रता निकष पदानुसार वेगवेगळे आहेत.
अर्जाची प्रक्रिया|Process of Application:
उमेदवारांनी www.midcindia.org ला भेट द्यावी आणि साइटवर उपलब्ध असलेल्या जाहिरातींच्या सूचनांचे पालन करावे. उमेदवारांनी www.midcindia.org या वेबसाइटवर अंतिम मुदतीत अर्ज सबमिट करावे. फक्त ऑनलाईन भरलेल्या अर्ज व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारची अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला जाणार नाही, परंतु वरील वेबसाइटवर वेळोवेळी प्रकाशित केलेल्या सूचनांनुसार कार्य करणे ही उमेदवाराची जबाबदारी असेल.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) भरती 2023 अर्ज कसा करावा?|How To Apply Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) Recruitment 2023?.
- सर्वप्रथम, Google उघडा आणि Search मधे MIDC अधिकृत वेबसाइट midcindia.org शोधा.
- MIDC www.midcindia.org ची अधिकृत वेबसाईट उघडा.
- नंतर “Recruitment 2023” वर क्लिक करून जाहिरात डाउनलोड करावी.
- भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि तुमची पात्रता तपासा.
- जर तुम्ही जाहिरातीत नमूद केलेल्या पदासाठी योग्य आणि पात्र असाल.
- तर, नवीन वापरकर्ता म्हणून नोंदणी करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करा.
- अर्जातील सर्व तपशील भरा आणि आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी काळजीपूर्वक अपलोड करा.
- फी साठीचे ऑनलाइन पेमेंट करा.
- दिलेल्या ऑनलाइन प्रक्रियेनुसार फॉर्म सबमिट करा..
- अर्जाचा प्रिंटआउट घ्या.
अर्ज फी/ परीक्षा शुल्क|Application fees/ Examination fees
- खुल्या वर्गाच्या उमेदवारांसाठी:- 1,000/-
- मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ/दिव्यांग :- 900/-
- माजी सैनिक / दिव्यांग माजी सैनिकांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही
ऑनलाइन फी भरण्याची शेवटची तारीख|Last date for payment of fee
ऑनलाइन फी भरण्याची शेवटची तारीख २५/०९/२०२३ पर्यंत राहील.
एजन्सीद्वारे आयोजित परीक्षा|Examination Conducted by Agency
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, सरळसेवा भरतीसाठी केवळ ऑनलाइन माध्यमातून अर्ज मगविण्यात आले आहे.
परीक्षा नमुना|Examination Pattern
परीक्षा ही सर्व पदांसाठी “संगणकीकृत प्रणालीद्वरा ऑनलाइन परीक्षा” आणि बहूपर्यायी स्वरूपात असेल.
परीक्षेची पद्धत|Mode of Examination
सरळसेवा भरतीसाठी केवळ ऑनलाइन माध्यमातून अर्ज मगविण्यात आले आहे.
परीक्षेचा कालावधी|Duration of Examination
परीक्षेचा कालावधी (भर्तीच्या पदानुसार – 60 ते 120 मिनिटे).
MIDC भरतीची निवड प्रक्रिया कशी आहे?|How is Selection Process of MIDC recruitment?
- परीक्षा ऑनलाइन होणार आहे.
- उमेदवारांना परीक्षेचे ठिकाण, तारीख आणि वेळ मोबाईलवर एसएमएस (SMS) व ई-मेलवर द्वारा कळवण्यात येईल. तसेच, महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळाद्वारा वेबसाइटवर सूचना देऊन माहिती कळवली जाईल. यासाठी उमेदवारांना वेळोवेळी एमआयडीसीच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
- परीक्षामध्ये यशस्वी झालेल्या पात्र प्रत्येक उमेदवाराला त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल पत्त्यावर आणि मोबाईल क्रमांकावर एसएमएस पाठविला जाईल व निवडयादी किंवा प्रतिक्षायादी आणि नियुक्तीबद्दल माहिती ई-मेलवर कळवली येईल.
MIDC चा परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे?|What is Examination Syllabus of MIDC?
विविध पदानुसार परीक्षेचा अभ्यासक्रम वेगवेगळा असेल, साधारण विविध पदानुसार एकुण अंदाजे – 100 प्रश्न खालील पॅटर्न प्रमाणे असतील: –
- भाग-1 (मराठी),
- भाग-2 (इंग्रजी)
- भाग-3 (सामाण्य ज्ञान)
- भाग-4 (बौध्दिक चाचणी),
- भाग-5 (म.औ.वि. अधिनियम),
- भाग-6 (तांत्रिक) असा असेल..
एकूण रिक्त जागा|Total vacancy
एकूण 802 पदे, पदांचा तपशील खाली दिला आहे.
MIDC भरतीच्या पदांचा तपशील काय आहे?|What is Details of Posts of MIDC Recruitment?
अधिक तपशीलांसाठी कृपया जाहिराती पहावी.
- गट-अ (कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप-अभियंता (स्थापत्य/विद्युत/यंत्रिकी), सहयोगी रचनाकार, उप रचनाकार, उप मुख्य लेखाधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी).
- गट-ब (सहाय्यक अभियंता (स्थापत्य/विद्युत/यंत्रिकी), सहाय्यक रचनाकार, सहाय्यक वास्तुशास्रज्ञ, लेखाधिकारी, क्षेत्र व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यंत्रिकी),
- गट-क (लघुलेखक (उच्च श्रेणी/निम्न श्रेणी), लघुटंकलेखक, सहाय्यक, लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल, तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-२), इलेक्ट्रिशियन (श्रेणी-२), पंपचालक (श्रेणी-२), जोडारी (श्रेणी-२), असिस्टंट ड्राफ्ट्समन, ड्राफ्ट्समन, गाळणी निरीक्षक, सर्वेक्षक, सहाय्यक अग्निशमन अधिकारी, कनिष्ठ संचार अधिकारी, इलेक्ट्रिशियनची श्रेणी-२ (ऑटोमोबाईल), चालक यंत्रचालक, अग्निशामक विमोचक)
MIDC भरतीचे वेतन आणि भत्ते काय आहे?|What is Salary and allownaces of MIDC Recruitment?
वर्ग ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ या श्रेणीनुसार, त्यांच्या पदांनुसार, नियुक्तिनुसार आणि शासन निर्णयानुसार असेल. पगार आणि इतर भत्ते – मुळ पगार + महागाई भत्ता + घर भाडे + वाहतूक भत्ता + इतर असे असेल.
उदा.
उप-अभियंता (स्थापत्य/विद्युत/यंत्रिकी), गट – अ, वेतनश्रेणी : S-20 : 56100-177500. या श्रेणीतील अधिकाऱ्याला मुंबई येथिल नियुक्तीवर मुळ पगार रु.56100 + महागाई भत्ता (42%) रु.23562 + घर भाडे (मुंबई येथे 27%) रु.15147 + वाहतूक भत्ता रु.7200 + वाहतूक भत्यावर महागाई भत्ता (42%) रु.3024 = एकुण वेतन रु. 1,05,033. प्रति महिना इतका पगार मिळण्याची शक्यता आहे.
भर्ती एजन्सी|Recruitment Agency
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई, महाराष्ट्र.
परीक्षा केंद्र|Examination Center
उमेदवारांनी उपलब्ध परीक्षा केंद्रांपैकी तीन परीक्षा केंद्र निवडावेत..
प्रवेशपत्र किंवा हॉल तिकीट डाउनलोड करा|Admit card or Hall ticket Download
परीक्षेच्या सात (7) दिवस आधी www.midcindia.org या संकेतस्थळावर ” Admit card/Hall ticket Download टॅबवर क्लिक करुन “डाउनलोड” करुन घ्यावे.
परीक्षेचा निकाल आणि कट ऑफ|Exam Result and Cut off
ऑनलाइन परीक्षेतील गुणांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाईल. गुणवत्ता यादीमध्ये समाविष्ट होण्यासाठी उमेदवाराला किमान ४५ गुण मिळणे आवश्यक आहे. पदानुसार इतर चाचणीतही उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. गुणवत्ता यादीमध्ये उमेदवारांची त्यांच्या गुणवत्तेवर आधारित निवड यादी तयार करण्यात येईल.
अधिकृत वेबसाइट|Official Website
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळची अधिकृत वेबसाइट https://www.midcindia.org/ बघू शकता. परीक्षेची अधिकृत अधिसूचनासाठी https://www.midcindia.org/wp-content/uploads/2023/08/Recruitment-Advertisement-2023.pdf वेबसाइट लिंकवर जाऊन जाहिरात सविस्तर पाहावी.
मदत डेस्क|Help Desk
अर्ज सबमिट करताना काही प्रश्न उद्भवल्यास उमेदवार https://cgrs.ibps.in/ ला भेट देऊ शकतात किंवा हेल्पलाइन 1800222366 / 18001034566 वर संपर्क साधावा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न|FAQ
Que:- MIDC चे full form काय आहे?
Ans:- MIDC चा full form महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आहे.
Que:- MIDC भरती 2023 मध्ये किती प्रकारची पदे आहेत?
Ans:- एकुण 34 प्रकारची पदे आहेत.
Que:- MIDC भरती 2023 मध्ये वर्ग अ पदासाठी किती पगार मिळेल?
Ans:- मुंबईत पोस्टिंग असेल तर अंदाजे एकुण वेतन रु.1,05,033. प्रति महिना इतका पगार मिळण्याची शक्यता आहे